एअर इंडिया, मुख्यमंत्री आणि मीडिया यांचत सत्य काय - The Fearless Indian
Home / India / एअर इंडिया, मुख्यमंत्री आणि मीडिया यांचत सत्य काय

एअर इंडिया, मुख्यमंत्री आणि मीडिया यांचत सत्य काय

  • Fearless Indian
  • July 3, 2015
Follow us on

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २९ जून रोजी अमेरिकेच्या दौऱ्यासाठी आपल्या शासकीय अधिकाऱ्यांसोबत एअर इंडियाच्या विमानाद्वारे रवाना होणार होते. वेळेनुसार देवेंद्र फडणवीस विमानात दाखल झाले होते आणि त्यांनी त्यांचे स्थान ग्रहण केले होते. मात्र विमान ठरलेल्या वेळेत उड्डाण घेऊ शकले नाही आणि येथूनच एका नवीन चर्चात्मक विषयाला तोंड फुटले. ही घटना जगजाहीर होताच, सर्वच प्रसारमाध्यमांनी आपल्या टिकास्त्रांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव करण्यास सुरवात केली. मुळात या संपुर्ण प्रकरणाचा क्रमवारीनुसार विचार केल्यास मुख्यमंत्र्यांवर टिका करण्याचे काही कारणच उरत नाही. प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री सचिवालयाचे प्रधान सचिव प्रविणसिंग परदेशी यांच्या पासपोर्टवर योग्य व्हिसापत्र  नसल्याने विमानाच्या उड्डाणाची वेळ खोळंबली असे प्रसारित केले. मुख्यमंत्र्यांमुळे प्रवाशांची गैरसोय झाली, मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिष्ठमंडळाशिवाय जाण्यास नकार दिला, मुख्यमंत्र्यांमुळे अमिरिकेच्या विमानाला उशीर झाला असे शाब्दिक हल्ले करत प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्यास सुरवात केली.

विमानाच्या उशीरा उड्डाण घेण्यावरुन एअर इंडियाने ट्विटरद्वारे तांत्रिक अडचणींमुळे विमानाने उशीरा उड्डाण केल्याचे स्पष्ट करत, याविषयीचा अहवालात्मक ईमेलही जाहीर केला.  (एअर इंडियाचे ट्विट)

तर प्रसारमाध्यमांच्या हल्ल्यांना त्वरित उत्तर देत त्यांनी टिवटरद्वारे स्पष्टीकरण दिले. त्यांनी प्रसारमाध्यमे करत असलेल्या सर्व आरोपांचे खंडण केले. (३० जूनचे ट्विट)

हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी आपल्या खंडपिठाशिवाय जाण्यास नकार दिला हे वक्तव्य  प्रसारमाध्यमांमध्ये घुमु लागले. यावर, मी असे म्हटल्याचे कोणताही अहवाल सांगत असेल तर तो शुद्ध खोटेपणा आहे, अशा खडतर शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

(देवेंद्र फडणवीस २ जून टिवट)

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहल्याप्रमाणे त्यांच्यासोबत विमानात उपस्थित प्रवाशांनीही मुख्यमंत्र्यांनी एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांवर विमानाच्या उड्डाणाबाबत कोणताही दबाव टाकला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र प्रसारमाध्यमांच्या सततच्या भडीमारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पुन्हा एकदा या सर्व आरोपांचे खंडण करत, भारतात परतल्यावर संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. (देवेंद्र फडणवीस ट्विट)

दुसरीकडे प्रसारमाध्यमे देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यां दोघांची एअर इंडिया उड्डाण प्रकरणात तुलना करत या घटनांना व्ही.आय.पी. संस्कृतीचे नाव देत आहे. मुळात या दोन्ही प्रकरणाची तुलना करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. किरण रिजूजा यांच्या प्रकरणात त्यांनी जाहीरपणे माफी मागितली आहे. ही दोन्ही प्रकरणे उद्भवण्याला कारणे आणि परिस्थिती भिन्न आहेत, हे सर्वांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

देवेंद्र फडणवीस यांच्यावरील सुरु असलेल्या वादाची झळ पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहचली आहे. त्यांनीही नैतिकतेनुसार देवेंद्र फडणवीस आणि किरण रिजूजा यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पदाचा गैरफायदा घेणारे समाजाच्या विविध स्तरावर अस्तित्वात आहेत हे भारतासाठी एक कटू सत्य आहे. मात्र प्रत्येकवेळी किंवा सर्वच सत्ताधारी आपल्या पदाचा गैरफायदा घेणारे नसतात. प्रसारमाध्यमे कोणतेही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचा पुढे जो काही निर्णय येईल, मात्र विमानाच्या उड्डाणाची प्रतिक्षा करणाऱ्या सामान्य नागरिकांपैकीच एक प्रवासी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही होते हे सध्याचे तथ्य आहे.

Facebook Comments

You may also like

Check Also

Narendra Modi’s landslide victory shatters Opponent’s grip on India!

...

Loading...